दशक सहावा : देवशोधन : समास नववा : सारशोधन

समास नववा : सारशोधन || .९ ||
॥श्रीराम॥ गुप्त आहे उदंड धन काय जाणती सेवक
जन तयांस  आहे  तें  ज्ञान  |  बाह्याकाराचें ||||
गुप्त ठेविले उदंड अर्थ आणी प्रगट दिसती पदार्थ |
शाहाणे  शोधिति  स्वार्थ  |  अंतरीं  असे  ||||
तैसें दृश्य हें माईक पाहात असती सकळ लोक |
परी जयांस ठाउका विवेक ते तदनंतर जाणती ||||
द्रव्य ठेऊन  जळ सोडिलें लोक  म्हणती  सरोवर
भरलें तयाचें अभ्यांतर कळलें समर्थ जनांसी ||||
तैसे ज्ञाते ते समर्थ तेहीं वोळखिला परमार्थ |
इतर ते करिती स्वार्थ दृश्य पदार्थांचा ||||
काबाडी  वाहती  काबाड श्रेष्ठ भोगिती रत्नें
जाड हें जयाचें तयास गोड कर्मयोगें ||||
येक काष्ठस्वार्थ करिती येक शुभा येकवाटिती |
तैसे  नव्हेत  कीं  नृपती  |  सारभोक्ते  ||||
जयांस आहे विचार ते सुकासनीं जाले स्वार |
इतर ते  जवळील भार वाहातचि  मेले  ||||
येक दिव्यान्नें भक्षिती येक विष्ठा सावडिती |
आपण  वर्तल्याचा  घेती साभिमान  ||||
सार सेविजे श्रेष्ठीं असार घेयिजे वृथापृष्टीं |
साराअसाराची गोष्टी सज्ञान जाणती ||१०||
गुप्त परीस चिंतामणी प्रगट खडे कांचमणी |
गुप्त हेमरत्नखाणी प्रगट पाषाण मृतिका ||११||
अव्हाशंख अव्हावेल गुप्त वनस्पति अमोल |
येरंड  धोत्रे  बहुसाल  |  प्रगट  सिंपी ||१२||
कोठें दिसेना कल्पतरू उदंड  सेरांचा  विस्तारू |
पाहातां नाहीं मळियागरू बोरि बाभळा उदंडी ||१३||
कामधेनु जाणिजे इंद्रें सृष्टींत  उदंड  खिल्लारें |
महद्भाग्य भोगिजे नृपवरें इतर कर्मानुसार ||१४||
नाना व्यापार करिती जन आवघेचि म्हणती सकांचन |
परंतु  कुबेराचें  महिमान  |  कोणासीचि   नये  ||१५||
तैसा ज्ञानी  योगीश्वर  |  गुप्तार्थलाभाचा  ईश्वर |
इतर ते पोटाचे किंकर नाना मतें धुंडिती ||१६||
तस्मात सार तें दिसेना आणी असार तें दिसे
जनां सारासारविवंचना साधु जाणती ||१७||
इतरांस हें काय सांगणे खरें खोटें कोण जाणे |
साधुसंतांचिये  खुणे साधुसंत  जाणती  ||१८||
दिसेना जें गुप्तधन तयासि करणें लागे अंजन |
गुप्त परमात्मा सज्जन संगतीं  शोधावा  ||१९||
रायाचे सन्निध होतां सहजचि लाभे श्रीमंतता |
तैसा हा सत्संग  धरितां सद्वस्तु  लाभे  ||२०||
सद्वस्तूस लाभे सद्वस्तु अव्यावेस्तास अव्यावेस्तु |
पाहातां  प्रशस्तास  प्रशस्तु विचार  लाभे  ||२१||
म्हणौनि हें दृश्यजात आवघेंचि  आहे  अशाश्वत |
परमात्मा अच्युत अनंत तो या दृश्यावेगळा ||२२||
दृश्यावेगळा दृश्याअन्तरीं सर्वात्मा तो सचराचरीं |
विचार  पाहातां  अंतरीं  |  निश्चये  बाणे  ||२३||
संसारत्याग न करितां प्रपंचउपाधी न सांडितां |
जनामध्ये  सार्थकता  |  विचारेंचि होये ||२४||**
हें प्रचितीचें बोलणें विवेकें प्रचित पाहाणें |
प्रचित पाहे ते शाहाणे अन्यथा नव्हे ||२५||
सप्रचित आणी अनुमान उधार आणी रोकडें धन |
मानसपूजा  प्रत्यक्ष  दर्शन यांस महदांतर  ||२६||
पुढें जन्मांतरीं होणार हा तो अवघाच उधार |
तैसें  नव्हे  सारासार तत्काळ  लाभे  ||२७||
तत्काळचि लाभ होतो प्राणी संसारीं सुटतो |
संशय अवघाचि तुटतो जन्ममरणाचा ||२८||
याचि  जन्में  येणेंचि  काळें संसारीं  होइजे
निराळें मोक्ष पाविजे निश्चळें स्वरूपाकारें ||२९||
ये गोष्टीस करी अनुमान तो सिद्धचि पावेल
पतन मिथ्या वदे त्यास आण उपासनेची ||३०||
हें येथार्थचि आहे बोलणें विवेकें सीघ्रचि मुक्त
होणें असोनी कांहींच नसणें जनामध्यें ||३१||
देवपद  आहे  निर्गुण  |  देवपदीं अनन्यपण |
हाचि अर्थ पाहातां पूर्ण समाधान बाणे ||३२||
देहींच विदेह होणें करून कांहींच न करणें |
जीवन्मुक्तांचीं लक्षणें जीवन्मुक्त जाणे ||३३||**
येरवीं हें खरें न वटे अनुमानेंचि संदेह वाटे |
संदेहाचें  मूळ  तुटे  |  सद्गुरुवचनें  ||३४||
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
*सारशोधननाम समास नववा || .९ ||

Popular posts from this blog

साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात ?

नामात राहणे हा सरळ मार्ग आहे

सदगुरुंचे महत्व