दशक पांचवा मंत्रं : समास पाचवा : बहुधाज्ञान

दशक पांचवा मंत्रं : समास पाचवा : बहुधाज्ञान

॥श्रीराम॥ जंव तें ज्ञान नाहीं प्रांजळ तंव सर्वकांहीं
निर्फळ ज्ञानरहित तळमळ जाणार  नाहीं  ||||
ज्ञान  म्हणतां  वाटे  भरम काये रे बा असेल
वर्म म्हणोनि हा अनुक्रम सांगिजेल आतां ||||
भूत भविष्य वर्तमान ठाउकें आहे परिछिन्न |
यासीहि म्हणिजेत ज्ञान परी तें ज्ञान नव्हे ||||
बहुत केलें विद्यापठण संगीतशास्त्र रागज्ञान |
वैदिक शास्त्र वेदाधेन हेंहि ज्ञान नव्हे ||||
नाना वेवसायाचें ज्ञान नाना दीक्षेचें ज्ञान |
नाना परीक्षेचें ज्ञान हें ज्ञान नव्हे ||||
नाना वनितांची परीक्षा नाना मनुष्यांची परीक्षा |
नाना  नरांची  परीक्षा  |  हें ज्ञान नव्हे  ||||
नाना अश्वांची परीक्षा नाना गजांची परीक्षा |
नाना स्वापदांची परीक्षा हें ज्ञान नव्हे ||||
नाना पशूंची परीक्षा नाना पक्षांची परीक्षा |
नाना भूतांची परीक्षा हें ज्ञान नव्हे ||||
नाना यानांची परीक्षा नाना वस्त्रांची परीक्षा |
नाना शस्त्रांची परीक्षा हें ज्ञान नव्हे ||||
नाना धातूंची परीक्षा नाना नाण्यांची परीक्षा |
नाना रत्नांची परीक्षा हें ज्ञान नव्हे ||१०||
नाना पाषाण परीक्षा नाना काष्ठांची परीक्षा |
नाना वाद्यांची परीक्षा हें ज्ञान नव्हे ||११||
नाना भूमींची परीक्षा नाना जळांची परीक्षा |
नाना सतेज परीक्षा हें ज्ञान नव्हे ||१२||
नाना रसांची परीक्षा नाना बीजांची परीक्षा |
नाना अंकुरपरीक्षा हें ज्ञान नव्हे ||१३||
नाना पुष्पांची परीक्षा नाना फळांची परीक्षा |
नाना वल्लींची परीक्षा हें ज्ञान नव्हे ||१४||
नाना दुःखांची परीक्षा नाना रोगांची परीक्षा |
नाना चिन्हांची परीक्षा हें ज्ञान नव्हे ||१५||
नाना मंत्रांची परीक्षा नाना यंत्रांची परीक्षा |
नाना मूर्तींची परीक्षा हें ज्ञान नव्हे ||१६||
नाना क्षेत्रांची परीक्षा नाना गृहांची परीक्षा |
नाना पात्रांची परीक्षा हें ज्ञान नव्हे ||१७||
नाना होणार परीक्षा नाना समयांची परीक्षा |
नाना तर्कांची परीक्षा हें ज्ञान नव्हे ||१८||
नाना अनुमानपरीक्षा नाना नेमस्त परीक्षा |
नाना प्रकार परीक्षा हें ज्ञान नव्हे ||१९||
नाना विद्येची परीक्षा नाना कळेची परीक्षा |
नाना चातुर्य परीक्षा हें ज्ञान नव्हे ||२०||
नाना शब्दांची परीक्षा नाना अर्थांची परीक्षा |
नाना भाषांची परीक्षा हें ज्ञान नव्हे ||२१||
नाना स्वरांची परीक्षा नाना वर्णांची परीक्षा |
नाना लेखनपरीक्षा हें ज्ञान नव्हे ||२२||
नाना मतांची परीक्षा नाना ज्ञानांची परीक्षा |
नाना वृत्तींची परीक्षा हें ज्ञान नव्हे ||२३||
नाना रूपांची परीक्षा नाना रसनेची परीक्षा |
नाना सुगंधपरीक्षा हें ज्ञान नव्हे ||२४||
नाना सृष्टींची परीक्षा नाना विस्तारपरीक्षा |
नाना पदार्थपरीक्षा हें ज्ञान नव्हे ||२५||
नेमकचि बोलणें तत्काळचि प्रतिवचन देणें |
सीघ्रचि कवित्व करणें हें ज्ञान नव्हे ||२६||
नेत्रपालवी नादकळा करपालवी भेदकळा |
स्वरपालवी संकेतकळा हें ज्ञान नव्हे ||२७||
काव्यकुशळ संगीतकळा गीत प्रबंद नृत्यकळा |
सभाचातुर्य शब्दकळा हें ज्ञान नव्हे ||२८||
वाग्विळास मोहनकळा रम्य रसाळ गायन कळा |
हास्य विनोद कामकळा हें ज्ञान नव्हे ||२९||
नाना लाघवें चित्रकळा नाना वाद्यें संगीतकळा |
नाना प्रकारें विचित्र कळा हें ज्ञान नव्हे ||३०||
आदिकरूनि चौसष्टि कळा याहि वेगळ्या नाना कळा |
चौदा विद्या सिद्धि सकळा हें ज्ञान नव्हे ||३१||
असो सकळ कळाप्रवीण विद्यामात्र परिपूर्ण |
तरी ते कौशल्यतापरी ज्ञान म्हणोंचि नये ||३२||
हें ज्ञान होयेसें  भासे  |  परंतु मुख्य  ज्ञान तें
अनारिसें जेथें प्रकृतीचें पिसें समूळ वाव ||३३||
जाणावें दुसर्‍याचें जीवीचें हे ज्ञान वाटे साचें |
परंतु हें  आत्मज्ञानाचें लक्षण  नव्हे  ||३४||
माहानुभाव माहाभला मानसपूजा करितां चुकला |
कोणी येकें पाचारिला ऐसें नव्हे म्हणोनी ||३५||
ऐसी जाणे  अंतरस्थिती तयासि  परम  ज्ञाता
म्हणती परंतु जेणें मोक्षप्राप्ती तें हें ज्ञान नव्हे ||३६||
बहुत प्रकारींची ज्ञानें सांगों जातां असाधारणें |
सायोज्यप्राप्ती होये जेणें तें ज्ञान वेगळें ||३७||
तरी तें कैसें आहे ज्ञान समाधानाचें लक्षण |
ऐसें हें विशद करून मज निरोपावें  ||३८||
ऐसें शुद्ध ज्ञान पुसिलें तें पुढिले समासीं निरोपिलें |
श्रोतां  अवधान  दिधलें  |  पाहिजे  पुढें  ||३९||
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
बहुधाज्ञाननाम समास पांचवा || ५.५ ||

Popular posts from this blog

साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात ?

नामात राहणे हा सरळ मार्ग आहे

सदगुरुंचे महत्व