दशक ३ : समास नववा : मृत्यनिरूपण

दशक ३ : समास नववा : मृत्यनिरूपण

॥श्रीराम॥ संसार म्हणिजे सवेंच स्वार नाहीं मरणास
उधार मापीं  लागलें  शरीर  |  घडीनें  घडी  ||||
नित्य काळाची संगती नकळे होणाराची गती |
कर्मासारिखे प्राणी पडती नाना देसीं विदेसीं ||||
सरतां संचिताचें शेष नाहीं क्षणाचा अवकाश |
भरतां  न  भरतां  निमिष्य जाणें लागे ||||
अवचितें काळाचे म्हणियारे  |  मारित सुटती
येकसरें नेऊन घालिती पुढारें मृत्यपंथे ||||
होतां मृत्याची आटाटी कोणी घालूं न सकती
पाठीं सर्वत्रांस कुटाकुटी मागेंपुढें होतसे ||||
मृत्यकाळ काठी निकी बैसे बळियाचे मस्तकीं |
माहाराजे बळिये  लोकीं  |  राहों न सकती ||||
मृत्य न म्हणे किं हा क्रूर मृत्य न म्हणे हा जुंझार |
मृत्य  न  म्हणे  संग्रामशूर  |  समरंगणीं  ||||
मृत्य न म्हणे किं हा कोपी मृत्य न म्हणे हा
प्रतापी मृत्य न म्हणे उग्ररूपी माहाखळ ||||
मृत्य न म्हणे बळाढ्य मृत्य न म्हणे धनाढ्य |
मृत्य    म्हणे  आढ्य  |  सर्व  गुणें  ||||
मृत्य न म्हणे हा विख्यात मृत्य न म्हणे हा
श्रीमंत मृत्य न म्हणे हा अद्‍भू पराक्रमी ||१०||
मृत्य न म्हणे हा भूपती मृत्य न म्हणे हा चक्रवती |
मृत्य न म्हणे हा  करामती कैवाड  जाणे  ||११||
मृत्य न म्हणे हयपती मृत्य न म्हणे गजपती |
मृत्य न म्हणे नरपती  |  विख्यात  राजा  ||१२||
मृत्य न म्हणे वरिष्ठ जनीं मृत्य न म्हणे राजकारणी |
मृत्य  न  म्हणे  वेतनी  |  वेतनधर्ता  ||१३||
मृत्य न म्हणे देसाई मृत्य न म्हणे वेवसाई |
मृत्य न म्हणे ठाईं ठाईं पुंडराजे  ||१४||
मृत्य न म्हणे मुद्राधारी मृत्य न म्हणे व्यापारी |
मृत्य  न  म्हणे  परनारी राजकन्या  ||१५||
मृत्य न म्हणे कार्याकारण मृत्य न म्हणे वर्णा-
वर्ण मृत्य न म्हणे हा ब्राह्मण कर्मनिष्ठ ||१६||
मृत्य न म्हणे वित्पन्न मृत्य न म्हणे संपन्न |
मृत्य  न  म्हणे  विद्वज्जन समुदाई  ||१७||
मृत्य न म्हणे हा धूर्त मृत्य न म्हणे बहुश्रुत |
मृत्य न म्हणे  हा पंडित  |  माहाभला ||१८||
मृत्य न म्हणे पुराणिक मृत्य न म्हणे हा वैदिक |
मृत्य न म्हणे  हा याज्ञिक अथवा जोसी  ||१९||
मृत्य न म्हणे अग्निहोत्री मृत्य न म्हणे हा श्रोत्री |
मृत्य न म्हणे  मंत्रयंत्री  |  पूर्णागमी  ||२०||
मृत्य न म्हणे शास्त्रज्ञ मृत्य न म्हणे वेदज्ञ |
मृत्य न म्हणे सर्वज्ञ  |  सर्व जाणे  ||२१||
मृत्य न म्हणे ब्रह्महत्या मृत्य न म्हणे गोहत्या |
मृत्य न म्हणे नाना हत्या स्त्रीबाळकादिक ||२२||
मृत्य न म्हणे रागज्ञानी मृत्य न म्हणे ताळज्ञानी |
मृत्य न म्हणे  तत्वज्ञानी  |  तत्ववेत्ता  ||२३||
मृत्य न म्हणे योगाभ्यासी मृत्य न म्हणे संन्यासी |
मृत्य न  म्हणे  काळासी वंचूं  जाणे  ||२४||
मृत्य न म्हणे हा सावध मृत्य न म्हणे हा सिद्ध |
मृत्य न म्हणे  वैद्य प्रसिद्ध  |  पंचाक्षरी  ||२५||
मृत्य न म्हणे हा गोसावी मृत्य न म्हणे हा तपस्वी |
मृत्य न म्हणे  हा मनस्वी  |  उदासीन  ||२६||
मृत्य न म्हणे ऋषेश्वर मृत्य न म्हणे कवेश्वर |
मृत्य न म्हणे  दिगंबर  |  समाधिस्थ  ||२७||
मृत्य न म्हणे हटयोगी मृत्य न म्हणे राजयोगी |
मृत्य न म्हणे  वीतरागी  |  निरंतर  ||२८||
मृत्य न म्हणे ब्रह्मचारी मृत्य न म्हणे जटाधारी |
मृत्य न म्हणे  निराहारी  |  योगेश्वर  ||२९||
मृत्य न म्हणे हा संत मृत्य न म्हणे हा महंत |
मृत्य न म्हणे  हा गुप्त  |  होत असे  ||३०||
मृत्य न म्हणे स्वाधेन मृत्य न म्हणे पराधेन |
सकळ जीवांस  प्राशन  |  मृत्यचि  करी ||३१||
येक मृत्यमार्गी लागले येकीं आर्ध पंथ क्रमिले |
येक ते  सेवटास  गेले  |  वृद्धपणीं  ||३२||
मृत्य न म्हणे बाळ तारुण्य मृत्य न म्हणे सुलक्षण |
मृत्य न  म्हणे  विचक्षण बहु  बोलिका  ||३३||
मृत्य न म्हणे हा आधारु मृत्य न म्हणे उदारु |
मृत्य न म्हणे हा सुंदरु चतुरांग जाणे ||३४||
मृत्य न म्हणे पुण्यपुरुष मृत्य न म्हणे हरिदास |
मृत्य न म्हणे विशेष सुकृती नर ||३५||
आतां असो हें बोलणें मृत्यापासून सुटिजे कोणें |
मागेंपुढें विश्वास  जाणें  |  मृत्यपंथें  ||३६||
च्यारी खाणी च्यारी वाणी चौऱ्यासी लक्ष जीवयोनी |
जन्मा आले  तितुके प्राणी मृत्य पावती  ||३७||
मृत्याभेणें पळों जातां तरी मृत्य सोडिना सर्वथा |
मृत्यास न  ये चुकवितां कांहीं  केल्या ||३८||
मृत्य न म्हणे हा स्वदेसी मृत्य न म्हणे हा विदेसी |
मृत्य न म्हणे  हा उपवासी  |  निरंतर  ||३९||
मृत्य न म्हणे थोर थोर मृत्य न म्हणे हरीहर |
मृत्य न म्हणे  अवतार  |  भगवंताचे  ||४०||
श्रोतीं कोप न करावा हा मृत्यलोक सकळांस ठावा |
उपजला प्राणी  जाईल बरवा  |  मृत्यपंथें  ||४१||
येथें न मनावा किंत हा मृत्यलोक विख्यात |
प्रगट जाणती समस्त लाहान थोर  ||४२||
तथापी किंत मानिजेल तरी हा मृत्यलोक नव्हेल |
याकारणें  नासेल  |  उपजला  प्राणी  ||४३||
ऐसें जाणोनियां जीवें याचें सार्थकची करावें |
जनीं मरोन  उरवावें  |  कीर्तिरूपें  ||४४||
येरवीं प्राणी लाहान थोर मृत्य पावती हा निर्धार |
बोलिलें हें अन्यथा उत्तर मानूंचि  नये  ||४५||
गेले हुत वैभवाचे गेले बहुत आयुष्याचे |
गेले अगाध  महिमेचे  |  मृत्यपंथें  ||४६||
गेले बहुत पराक्रमी गेले बहुत कपटकर्मी |
गेले बहुत  संग्रामी  |  संग्रामसौरे  ||४७||
गेले बहुतां बळांचे गेले बहुतां काळांचे |
गेले बहुतां कुळांचे कुळवंत राजे  ||४८||
गेले बहुतांचे पाळक गेले बुद्धीचे चाळक |
गेले युक्तीचे  तार्किक  |  तर्कवादी  ||४९||
गेले विद्येचे सागर गेले बळाचे डोंग़र |
गेले  धनाचे  कुबेर  |  मृत्यपंथे ||५०||
गेले बहुत पुरुषार्थाचे गेले बहुत विक्रमाचे |
गेले बहुत  आटोपाचे  |  कार्यकर्ते  ||५१||
गेले बहुत शस्त्रधारी गेले बहुत परोपकारी |
गेले बहुत  नानापरी  |  धर्मरक्षक  ||५२||
गेले बहुत प्रतापाचे गेले बहुत सत्कीर्तीचे |
गेले बहुत  नीतीचे  |  नीतिवंत  राजे ||५३||
गेले बहुत मतवादी गेले बहुत कार्यवादी |
गेले बहुत  वेवादी  |  बहुतांपरीचे  ||५४||
गेलीं पंडितांची थाटें गेलीं शब्दांचीं कचाटें |
गेलीं वादकें  अचाटें  |  नाना  मतें  ||५५||
गेले तापस्यांचे भार गेले संन्यासी अपार |
गेले विचारकर्ते  सार  |  मृत्यपंथे  ||५६||
गेले बहुत संसारी  |  गेले बहुत वेषधारी |
गेले बहुत नानापरी नाना छंद करूनी ||५७||
गेले ब्राह्मणसमुदाये गेले बहुत आचार्ये |
गेले बहुत सांगों काये किती म्हणोनी ||५८||
असो ऐसे सकळही गेले परंतु येकचि राहिले |
जे स्वरुपाकार  जाले  |  आत्मज्ञानी  ||५९||
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
मृत्यनिरूपणनाम समास नववा || .९ ||

Popular posts from this blog

साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात ?

नामात राहणे हा सरळ मार्ग आहे

सदगुरुंचे महत्व