दशक दुसरा : समास सहावा : तमोगुणलक्षण*

दशक दुसरा : समास सहावा : तमोगुणलक्षण*
॥श्रीराम॥ मागां  बोलिला  रजोगुण  |  क्रियेसहित
लक्षण आतां ऐका तमोगुण तोहि सांगिजेल ||||
संसारीं दुःखसंमंध प्राप्त होतां उठे खेद |
कां अद्भुत आला क्रोध तो तमोगुण ||||
शरीरीं क्रोध भरतां नोळखे माता पिता |
बंधु बहिण कांता ताडी तो तमोगुण ||||
दुसऱ्याचा प्राण घ्यावा आपला आपण स्वयें
द्यावा विसरवी जीवभावा तो तमोगुण ||||
भरलें क्रोधाचें काविरें पिश्याच्यापरी वावरे |
नाना  उपायें  नावरे  |  तो  तमोगुण ||||
आपला आपण शस्त्रपात पराचा करी घात |
ऐसा  समय  वर्तत  |  तो  तमोगुण  ||||
डोळां  युध्यचि  पाहावें रण  पडिलें तेथें
जावें ऐसें घेतलें जीवें तो तमोगुण ||||
अखंड भ्रांती पडे केला निश्चय विघडे |
अत्यंत निद्रा आवडे तो तमोगुण ||||
क्षुधा जयाची वाड नेणे कडु अथवा गोड |
अत्यंत जो कां मूढ  |  तो तमोगुण  ||||
प्रीतिपात्र गेलें मरणें तयालागीं जीव देणें |
स्वयें आत्महत्या करणें तो तमोगुण ||१०||
किडा मुंगी  आणी स्वापद यांचा करूं आवडे
वध अत्यंत जो कृपामंद तो तमोगुण ||११||
स्त्रीहत्या बाळहत्या द्रव्यालागीं ब्रह्महत्या |
करूं आवडे गोहत्या तो  तमोगुण ||१२||
विसाळाचेनि नेटें वीष घ्यावेंसें वाटे |
परवध मनीं उठे तो तमोगुण ||१३||
अंतरीं धरूनि कपट पराचें करी तळपट |
सदा मस्त सदा उद्धट तो तमोगुण ||१४||
कळह व्हावा  ऐसें वाटे झोंबी घ्यावी ऐसें
उठे अन्तरी द्वेष प्रगटे तो तमोगुण ||१५||
युध्य देखावें ऐकावें स्वयें युध्यचि करावें |
मारावें कीं  मरावें  |  तो तमोगुण  ||१६||
मत्सरें भक्ति मोडावी देवाळयें विघडावीं |
फळतीं  झाडें तोडावीं तो तमोगुण ||१७||
सत्कर्में ते नावडती नाना दोष ते आवडती |
पापभय  नाहीं  चित्ती  तो  तमोगुण ||१८||
ब्रह्मवृत्तीचा उछेद जीवमात्रास देणें खेद |
करूं आवडे अप्रमाद तो तमोगुण ||१९||
आग्नप्रळये शस्त्रप्रळये भूतप्रळये वीषप्रळये |
मत्सरें करीं  जीवक्षये तो तमोगुण  ||२०||
परपीडेचा संतोष निष्ठुरपणाचा हव्यास |
संसाराचा नये त्रास तो तमोगुण ||२१||
भांडण लाऊन द्यावें स्वयें कौतुक पाहावें |
कुबुद्धि  घेतली जीवें तो  तमोगुण ||२२||
प्राप्त जालियां संपत्ती जीवांस करी यातायाती |
कळवळा  नये  चित्तीं  |  तो  तमोगुण ||२३||
नावडे भक्ति नावडे भाव नावडे तीर्थ नावडे देव |
वेदशास्त्र  नलगे  सर्व  |  तो  तमोगुण ||२४||
स्नानसंध्या नेम नसे स्वधर्मीं भ्रष्टला दिसे |
अकर्तव्य  करीतसे  |  तो  तमोगुण  ||२५||
जेष्ठ बंधु बाप माये त्यांचीं वचनें न साहे |
सीघ्रकोपी निघोन जाये तो तमोगुण ||२६||
उगेंचि खावें उगेंचि असावें स्तब्ध होऊन बैसावें |
कांहींच  स्मरेना  स्वभावें  |  तो तमोगुण ||२७||
चेटकविद्येचा अभ्यास शस्त्रविद्येचा हव्यास |
मल्लविद्या व्हावी ज्यास तो तमोगुण ||२८||
केले गळाचे नवस राडिबेडीचे  सायास |
काष्ठयंत्र छेदी जिव्हेस तो तमोगुण ||२९||
मस्तकीं भदें जाळावें पोतें आंग हुरपळावें |
स्वयें शस्त्र टोचून घ्यावें तो तमोगुण ||३०||
देवास सिर वाहावें कां तें  आंग समर्पावें |
पडणीवरून घालून घ्यावे तो तमोगुण ||३१||
निग्रह करून धरणें कां तें टांगून घेणें |
देवद्वारीं जीव  देणें तो  तमोगुण ||३२||
निराहार  उपोषण  |  पंचाग्नी  धूम्रपान |
आपणास घ्यावें पुरून तो तमोगुण ||३३||
सकाम जें का अनुष्ठान कां तें वायोनिरोधन |
अथवा  राहावें  पडोन  |  तो  तमोगुण ||३४||
नखें केश वाढवावे हस्तचि वर्ते करावे |
अथवा वाक्‍शून्य व्हावें तो तमोगुण ||३५||
नाना निग्रहें पिडावें देहदुःखें चर्फडावें |
क्रोधें देवास फोडावें तो तमोगुण ||३६||
देवाची जो निंदा करी तो आशाबद्धि अघोरी |
जो  संतसंग  न  धरी तो तमोगुण ||३७||
ऐसा हा तमोगुण सांगतां तो असाधारण |
परी  त्यागार्थ  निरूपण कांहीं येक ||३८||
ऐसें  वर्ते  तो  तमोगुण परी हा पतनास
कारण मोक्षप्राप्तीचें लक्षण नव्हे येणें ||३९||
केल्या कर्माचें फळ प्राप्त होईल सकळ |
जन्म  दुःखाचें  मूळ  तुटेना कीं ||४०||
व्हावया जन्माचें खंडण पाहिजे तो सत्वगुण |
तेंचि  असे  निरुपण पुढिले  समासीं  ||४१||
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
*तमोगुणलक्षणनाम समास सहावा || .६ ||

Popular posts from this blog

साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात ?

नामात राहणे हा सरळ मार्ग आहे

सदगुरुंचे महत्व