Posts

Showing posts from July, 2016

Dasbodh Nirupan Dashak Dusara All Samaas

Image

Dasbodh Dashak Pahila All Samaas Nirupan

Image

दशक पहिला स्तवन : समास दहावा : नरदेहस्तवननिरूपण

दशक पहिला स्तवन : समास दहावा : नरदेहस्तवननिरूपण श्रीराम् ॥ धन्य धन्य हा नरदेहो । येथील अपूर्वता पाहो । जो जो कीजे परमार्थलाहो । तो तो पावे सिद्धीतें ॥ १॥ या नरदेहाचेनि लागवेगें । येक लागले भक्तिसंगें । येकीं परम वीतरागें । गिरिकंदरें सेविलीं ॥ २॥ येक फिरती तिर्थाटणें । येक करिती पुरश्चरणें । येक अखंड नामस्मरणें । निष्ठावंत राहिले ॥ ३॥ येक तपें करूं लागले । येक योगाभ्यासी माहाभले । येक अभ्यासयोगें जाले । वेदशास्त्री वित्पन्न ॥ ४॥ येकीं हटनिग्रह केला । देह अत्यंत पीडिला । येकीं देह ठाईं पाडिला । भावार्थबळें ॥ ५॥ येक माहानुभाव विख्यात । येक भक्त जाले ख्यात । येक सिद्ध अकस्मात । गगन वोळगती ॥ ६॥ येक तेजीं तेजचि जाले । येक जळीं मिळोन गेले । येक ते दिसतचि अदृश्य जाले । वायोस्वरूपीं ॥ ७॥ येक येकचि बहुधा होती । येक देखतचि निघोनि जाती । येक बैसले असतांची भ्रमती । नाना स्थानीं समुद्रीं ॥ ८॥ येक भयानकावरी बैसती । एक अचेतनें चालविती । येक प्रेतें उठविती । तपोबळेंकरूनी ॥ ९॥ येक तेजें मंद करिती । येक जळें आटविती । येक वायो निरोधिती । विश्वजनाचा ॥ १०॥ ऐसे हटनिग्रही कृतबुद्धी । जयांस वोळल्या नाना सिद्ध…

दशक पहिला स्तवन : समास नववा : परमार्थस्तवन

दशक पहिला स्तवन : समास नववा : परमार्थस्तवन श्रीराम् ॥ आतां स्तऊं हा परमार्थ । जो साधकांचा निजस्वार्थ । नांतरी समर्थामध्ये समर्थ । योग हा ॥ १॥ आहे तरी परम सुगम । परी जनासी जाला दुर्गम । कां जयाचें चुकलें वर्म । सत्समागमाकडे ॥ २॥ नाना साधनांचे उधार । हा रोकडा ब्रह्मसाक्षात्कार । वेदशास्त्रीं जें सार । तें अनुभवास ये ॥ ३॥ आहे तरी चहूंकडे । परी अणुमात्र दृष्टी न पडे । उदास परी येकीकडे । पाहातां दिसेना ॥ ४॥ आकाशमार्गी गुप्त पंथ । जाणती योगिये समर्थ । इतरांस हा गुह्यार्थ । सहसा न कळे ॥ ५॥ साराचेंहि निजसार । अखंड अक्षै अपार । नेऊं न सकती तश्कर । कांही केल्या ॥ ६॥ तयास नाहीं राजभये । अथवा नाहीं अग्निभये । अथवास्वापदभये । बोलोंच नये ॥ ७॥ परब्रह्म तें हालवेना । अथवा ठावही चुकेना । काळांतरी चळेना । जेथीचा तेथें ॥ ८॥ ऐसें तें निज ठेवणें । कदापि पालटों नेणे । अथवा नव्हे आदिक उणें । बहुतां काळें ॥ ९॥ अथवा तें घसवटेना । अथवा अदृश्य होयेना । नांतरी पाहातां दिसेना । गुरुअंजनेविण ॥ १०॥ मागां योगिये समर्थ । त्यांचाहि निजस्वार्थ । यासि बोलिजे परमार्थ । परमगुह्य म्हणौनि ॥ ११॥ जेंही शोधून पाहिला । त्यासी अर…

दशक पहिला स्तवन : समास आठवा : सभास्तवन

दशक पहिला स्तवन : समास आठवा : सभास्तवन श्रीराम् ॥ अतां वंदूं सकळ सभा । जये सभेसी मुक्ति सुल्लभा । जेथें स्वयें जगदीश उभा । तिष्ठतु भरें ॥ १॥ श्लोक ॥ नाह । म् वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ । मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद ॥ नाहीं वैकुंठीचा ठाईं । नाहीं योगियांचा हृदईं । माझे भक्त गाती ठाईं ठाईं । तेथें मी तिष्ठतु नारदा ॥ २॥ याकारणें सभा श्रेष्ठ । भक्त गाती तें वैकुंठ । नामघोषें घडघडाट । जयजयकारें गर्जती ॥ ३॥ प्रेमळ भक्तांचीं गायनें । भगवत्कथा हरिकीर्तनें । वेदव्याख्यान पुराणश्रवणें । जेथें निरंतर ॥ ४॥ परमेश्वराचे गुणानुवाद । नाना निरूपणाचे संवाद । अध्यात्मविद्या भेदाभेद । मथन जेथे ॥ ५॥ नाना समाधानें तृप्ती । नाना आशंकानिवृत्ती । चित्तीं बैसे ध्यानमूर्ति । वाग्विळासें ॥ ६॥ भक्त प्रेमळ भाविक । सभ्य सखोल सात्त्विक । रम्य रसाळ गायक । निष्ठावंत ॥ ७॥ कर्मसीळ आचारसीळ । दानसीळ धर्मसीळ । सुचिस्मंत पुण्यसीळ । अंतरशुद्ध कृपाळु ॥ ८॥ योगी वीतरागी उदास । नेमक निग्रह तापस । विरक्त निस्पृह बहुवस । आरण्यवासी ॥ ९॥ दंडधारी जटाधारी । नाथपंथी मुद्राधारी । येक बाळब्रह्मचारी । योगेश्वर ॥ १०॥ पुरश्…

दशक पहिला स्तवन : समास सातवा : कवेश्वरस्तवन

दशक पहिला स्तवन : समास सातवा : कवेश्वरस्तवन श्रीराम् ॥ आतां वंदूं कवेश्वर । शब्दसृष्टीचे ईश्वर । नांतरी हे परमेश्वर । वेदावतारी ॥ १॥ कीं हे सरस्वतीचें निजस्थान । कीं हे नाना कळांचें जीवन । नाना शब्दांचें भुवन । येथार्थ होये ॥ २॥ कीं हे पुरुषार्थाचें वैभव । कीं हे जगदीश्वराचें महत्व । नाना लाघवें सत्कीर्तीस्तव । निर्माण कवी ॥ ३॥ कीं हे शब्दरत्नाचे सागर । कीं हे मुक्तांचे मुक्त सरोवर । नाना बुद्धीचे वैरागर । निर्माण जाले ॥ ४॥ अध्यात्मग्रंथांची खाणी । कीं हे बोलिके चिंतामणी । नाना कामधेनूचीं दुभणीं । वोळलीं श्रोतयांसी ॥ ५॥ कीं हे कल्पनेचे कल्पतरु । कीं हे मोक्षाचे मुख्य पडीभरु । नाना सायोज्यतेचे विस्तारु । विस्तारले ॥ ६॥ कीं हा परलोकींचा निजस्वार्थु । कीं हा योगियांचा गुप्त पंथु । नाना ज्ञानियांचा परमार्थु । रूपासि आला ॥ ७॥ कीं हे निरंजनाची खूण । कीं हे निर्गुणाची वोळखण । मायाविलक्षणाचे लक्षण । ते हे कवी ॥ ८॥ कीं हा श्रुतीचा भावगर्भ । कीं हा परमेश्वराचा अलभ्य लाभ । नातरी होये सुल्लभ । निजबोध कविरूपें ॥ ९॥ कवि मुमुक्षाचें अंजन । कवि साधकांचें साधन । कवि सिद्धांचें समाधान । निश्चयात्मक ॥ १०…

दशक पहिला स्तवन : समास सहावा : श्रोतेजनस्तवन

दशक पहिला स्तवन : समास सहावा : श्रोतेजनस्तवन श्रीराम् ॥ आतां वंदूं श्रोते जन । भक्त ज्ञानी संत सज्जन । विरक्त योगी गुणसंपन्न । सत्यवादी ॥ १॥ येक सत्वाचे सागर । येक बुद्धीचे आगर । येक श्रोते वैरागर । नाना शब्दरत्नांचे ॥ २॥ जे नाना अर्थांबृताचे भोक्ते । जे प्रसंगीं वक्तयाचे वक्ते । नाना संशयातें छेदिते । निश्चै पुरुष ॥ ३॥ ज्यांची धारणा अपार । जे ईश्वराचे अवतार । नांतरी प्रत्यक्ष सुरवर । बैसले जैसे ॥ ४॥ किं हे ऋषेश्वरांची मंडळी । शांतस्वरूप सत्वागळी । जयांचेनि सभामंडळीं । परम शोभा ॥ ५॥ हृदईं वेदगर्भ विलसे । मुखीं सरस्वती विळासे । साहित्य बोलतां जैसे । भासती देवगुरु ॥ ६॥ जे पवित्रपणें वैश्वानर । जे स्फूर्तिकिरणाचे दिनकर । ज्ञातेपणें दृष्टीसमोरे । ब्रह्मांड न ये ॥ ७॥ जे अखंड सावधान । जयांस त्रिकाळाचें ज्ञान । सर्वकाळ निराभिमान । आत्मज्ञानी ॥ ८॥ ज्यांचे दृष्टीखालून गेलें । ऐंसें कांहींच नाहीं उरलें । पदार्थमात्रांसी लक्षिलें । मनें जयांच्या ॥ ९॥ जें जें कांहीं आठवावें । तें तें तयांस पूर्वीच ठावें । तेथें काये अनुवादावें । ज्ञातेपणेंकरूनी ॥ १०॥ परंतु हे गुणग्राहिक । म्हणौन बोलतों निःशंक । भ…

दशक पहिला स्तवन : समास पांचवा : संतस्तवन

दशक पहिला स्तवन : समास पांचवा : संतस्तवन श्रीराम ॥ आतां वंदीन सज्जन । जे परमार्थाचें अधिष्ठान । जयांचेनि गुह्यज्ञान । प्रगटे जनीं ॥ १॥ जे वस्तु परम दुल्लभ । जयेचा अलभ्य लाभ । तेंचि होये सुल्लभ । संतसंगेकरूनी ॥ २॥ वस्तु प्रगटचि असे । पाहातां कोणासीच न दिसे । नाना साधनीं सायासें । न पडे ठाईं ॥ ३॥ जेथें परिक्षवंत ठकले । नांतरी डोळसचि अंध जाले । पाहात असताअंचि चुकले । निजवस्तूसी ॥ ४॥ हें दीपाचेनि दिसेना । नाना प्रकाशें गवसेना । नेत्रांजनेंहि वसेना । दृष्टीपुढें ॥ ५॥ सोळां कळी पूर्ण शशी । दाखवू शकेना वस्तूसी । तीव्र आदित्य कळारासी । तोहि दाखवीना ॥ ६॥ जया सुर्याचेनि प्रकाशें । ऊर्णतंतु तोहि दिसे । नाना सूक्ष्म पदार्थ भासे । अणुरेणादिक ॥ ७॥ चिरलें वाळाग्र तेंहि प्रकासी । परी तो दाखवीना वस्तूसी । तें जयाचेनि साधकांसी । प्राप्त होये ॥ ८॥ जेथें आक्षेप आटले । जेथें प्रेत्न प्रस्तावले । जेथें तर्क मंदावले । तर्कितां निजवस्तूसी । वळे विवेकाची वेगडी । पडे शब्दाची बोबडी । जेथें मनाची तांतडी । कामा नये ॥ १०॥ जो बोलकेपणें विशेष । सहस्र मुखांचा जो शेष । तोहि सिणला निःशेष । वस्तु न संगवे ॥ ११॥ वेदे प्रक…

दशक पहिला स्तवन : समास चवथा : सद्गुरुस्तवन

दशक पहिला स्तवन : समास चवथा : सद्गुरुस्तवन श्रीराम ॥ आतां सद्गुरु वर्णवेना । जेथें माया स्पर्शों सकेना । तें स्वरूप मज अज्ञाना । काये कळे ॥ १॥ न कळे न कळे नेति नेति । ऐसें बोलतसे श्रुती । तेथें मज मूर्खाची मती । पवाडेल कोठें ॥ २॥ मज न कळे हा विचारु । दुऱ्हूनि माझा नमस्कारु । गुरुदेवा पैलपारु । पाववीं मज ॥ ३॥ होती स्तवनाची दुराशा । तुटला मायेचा भर्वसा । आतां असाल तैसे असा । सद्गुरु स्वामी ॥ ४॥ मायेच्या बळें करीन स्तवन । ऐसें वांछित होतें मन । माया जाली लज्यायमान । काय करूं ॥ ५॥ नातुडे मुख्य परमात्मा । म्हणौनी करावी लागे प्रतिमा । तैसा मायायोगें महिमा । वर्णीन सद्गुरूचा ॥ ६॥ आपल्या भावासारिखा मनीं । देव आठवावा ध्यानीं । तैसा सद्गुरु हा स्तवनीं । स्तऊं आतां ॥ ७॥ जय जया जि सद्गुरुराजा । विश्वंभरा बिश्वबीजा । परमपुरुषा मोक्षध्वजा । दीनबंधु ॥ ८॥ तुझीयेन अभयंकरें । अनावर माया हे वोसरे । जैसें सूर्यप्रकाशें अंधारें । पळोन जाये ॥ ९॥ आदित्यें अंधकार निवारे । परंतु मागुतें ब्रह्मांड भरे । नीसी जालियां नंतरें । पुन्हां काळोखें ॥ १०॥ तैसा नव्हे स्वामीराव । करी जन्ममृत्य वाव । समूळ अज्ञानाचा ठाव ।…

दशक पहिला स्तवन : समास तिसरा : शारदास्तवन

दशक पहिला स्तवन : समास तिसरा : शारदास्तवन श्रीराम ॥ आतां वंदीन वेदमाता । श्रीशारदा ब्रह्मसुता । शब्दमूल वाग्देवता । माहं माया ॥ १॥ जे उठवी शब्दांकुर । वदे वैखरी अपार । जे शब्दाचें अभ्यांतर । उकलून दावी ॥ २॥ जे योगियांची समाधी । जे धारिष्टांची कृतबुद्धी । जे विद्या अविद्या उपाधी । तोडून टाकी ॥ ३॥ जे माहापुरुषाची भार्या । अति सलग्न अवस्था तुर्या । जयेकरितां महत्कार्या । प्रवर्तले साधु ॥ ४॥ जे महंतांची शांती । जे ईश्वराची निज शक्ती । जे ज्ञानियांची विरक्ती । नैराशशोभा ॥ ५॥ जे अनंत ब्रह्मांडें घडी । लीळाविनोदेंचि मोडी । आपण आदिपुरुषीं दडी । मारून राहे ॥ ६॥ जे प्रत्यक्ष पाहातां आडळे । विचार घेतां तरी नाडळे । जयेचा पार न कळे । ब्रह्मादिकांसी ॥ ७॥ जे सर्व नाटक अंतर्कळा । जाणीव स्फूर्ती निर्मळा । जयेचेनी स्वानंदसोहळा । ज्ञानशक्ती ॥ ८॥ जे लावण्यस्वरूपाची शोभा । जे परब्रह्मसूर्याची प्रभा । जे शब्दीं वदोनि उभा । संसार नासी ॥ ९॥ जे मोक्षश्रिया माहांमंगळा । जे सत्रावी जीवनकळा । हे सत्त्वलीळा सुसीतळा । लावण्यखाणी ॥ १०॥ जे अवेक्त पुरुषाची वेक्ती । विस्तारें वाढली इच्छाशक्ती । जे कळीकाळाची नियंती । …

दशक पहिला स्तवन :समास दुसरा : गणेशस्तवन

दशक पहिला स्तवन :समास दुसरा : गणेशस्तवन ॥ श्रीराम ॥ ॐ नमोजि गणनायेका । सर्व सिद्धिफळदायेका । अज्ञानभ्रांतिछेदका । बोधरूपा ॥ १॥ माझिये अंतरीं भरावें । सर्वकाळ वास्तव्य करावें । मज वाग्सुंन्यास वदवावें । कृपाकटाक्षेंकरूनी ॥ २॥ तुझिये कृपेचेनि बळें । वितुळती भ्रांतीचीं पडळें । आणी विश्वभक्षक काळें । दास्यत्व कीजे ॥ ३॥ येतां कृपेची निज उडी । विघ्नें कापती बापुडीं । होऊन जाती देशधडी । नाममात्रें ॥ ४॥ म्हणौन नामें विघ्नहर । आम्हां अनाथांचे माहेर । आदिकरूनी हरीहर । अमर वंदिती ॥ ५॥ वंदूनियां मंगळनिधी । कार्य करितां सर्वसिद्धी । आघात अडथाळे उपाधी । बाधूं सकेना ॥ ६॥ जयाचें आठवितां ध्यान । वाटे परम समाधान । नेत्रीं रिघोनियां मन । पांगुळे सर्वांगी ॥ ७॥ सगुण रूपाची टेव । माहा लावण्य लाघव । नृत्य करितां सकळ देव । तटस्त होती ॥ ८॥ सर्वकाळ मदोन्मत्त । सदा आनंदे डुल्लत । हरूषें निर्भर उद्दित । सुप्रसन्नवदनु ॥ ९॥ भव्यरूप वितंड । भीममूर्ति माहा प्रचंड । विस्तीर्ण मस्तकीं उदंड । सिंधूर चर्चिला ॥ १०॥ नाना सुगंध परिमळें । थबथबा गळती गंडस्थळें । तेथें आलीं षट्पदकुळें । झुंकारशब्दें ॥ ११॥ मुर्डीव शुंडादंड सरळे…

दशक पहिला स्तवन :समास पहिला : ग्रंथारंभलक्षण

Image
|| श्रीरामसमर्थ || || श्रीमत् दासबोध || दशक पहिला स्तवन :समास पहिला : ग्रंथारंभलक्षण

॥ श्रीराम ॥ श्रोते पुसती कोण ग्रंथ । काय बोलिलें जी येथ । श्रवण केलियानें प्राप्त । काय आहे ॥ १॥ ग्रंथा नाम दासबोध । गुरुशिष्यांचा संवाद । येथ बोलिला विशद । भक्तिमार्ग ॥ २॥ नवविधा भक्ति आणि ज्ञान । बोलिलें वैराग्याचें लक्षण । बहुधा अध्यात्म निरोपण । निरोपिलें ॥ ३॥ भक्तिचेन योगें देव । निश्चयें पावती मानव । ऐसा आहे अभिप्राव । ईये ग्रंथीं ॥ ४॥ मुख्य भक्तीचा निश्चयो । शुद्धज्ञानाचा निश्चयो । आत्मस्थितीचा निश्चयो । बोलिला असे ॥ ५॥ शुद्ध उपदेशाचा निश्चयो । सायोज्यमुक्तीचा निश्चयो । मोक्षप्राप्तीचा निश्चयो । बोलिला असे ॥ ६॥ शुद्धस्वरूपाचा निश्चयो । विदेहस्थितीचा निश्चयो । अलिप्तपणाचा निश्चयो । बोलिला असे ॥ ७॥ मुख्य देवाचा निश्चयो । मुख्य भक्ताचा निश्चयो । जीवशिवाचा निश्चयो । बोलिला असे ॥ ८॥ मुख्य ब्रह्माचा निश्चयो । नाना मतांचा निश्चयो । आपण कोण हा निश्चयो । बोलिला असे ॥ ९॥ मुख्य उपासनालक्षण । नाना कवित्वलक्षण । नाना चातुर्यलक्षण । बोलिलें असे ॥ १०॥ मायोद्भवाचें लक्षण । पंचभूतांचे लक्षण । कर्ता कोण हें लक्षण ।…