Posts

होळी महात्म कथा - होळी म्हणजे वाईट विचारांचे दहन

Image
होळी हा देशभर रंगांचा सण म्हणून ओळखला जात असला तरी महाराष्ट्रात त्याचे महत्त्व वेगळे आहे. ग्रामीण भागात शिमगा या नावाने ओळखला जाणार्‍या सणामागे एक आख्यायिका आहे.पूर्वी राक्षसकुळात हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता. तो स्वत:ला श्रेष्ठ समजत असे. देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा (नारायणाचा) परमभक्त होता. प्रल्हाद दिवस-रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे. नेमके हेच हिरण्यकश्यपूला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रत्येकवेळी तो अयशस्वी ठरला. अखेरीस कंटाळून हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला. या कामात त्याने आपल्या बहिणीची मदत घेतली. होलिका हे तिचे नाव. ती राक्षसीप्रवृत्तीची आणि क्रूर होती. तिला अग्नीचे भय नव्हते. अग्नीपासून तिला कोणताच त्रास होत नव्हता. म्हणून हिरण्यकश्यपूने लाकडाची चिता रचली. त्यावर होलिकेला बसविले. आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसविले. परंतु, प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले. होलिका जळून खाक झाली. आणि विष्णू …

ज्ञान वैराग्य व सामर्थ्य ही फलश्रुती ( सदा संगती सज्जनांची धरावी )

Image
मनाच्या श्लोकांना महत्वाचे स्थान आहे. विनोबा भावे त्यांना ‘मनोपनिषद्’ असेच म्हणतात.

मनाच्या श्लोकात अनंत राघवाचा पंथ विवरण करून सांगितला आहे. रामानुसंधानाने आपल्याला जो आत्मसाक्षात्काराच्या अनुभवाचा आनंद प्राप्त झाला तो आनंद इतरांनाही भोगायला मिळावा अशी समर्थांना तळमळ होती. अशा आनंदाचा अनुभव घेण्यासाठी मन हे तयार करावे लागते. ‘मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयो:’ असे म्हटलेच आहे. मनामुळेच बंध व मनामुळेच मोक्ष प्राप्त होतो. मन ही एक विलक्षण चीज आहे. मनच मनुष्याला देवत्वाचा अथवा दानवत्वाचा मार्ग दाखवते.


आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु । बुद्धिं तु सारथिं विद्धि मन: प्रग्रहमेव च ॥

असा कठोपनिषदात एक सुंदर श्लोक आला आहे. त्यात जीवात्म्यावर रथीचे (रथ चालवणार्‍याचे) रूपक केले आहे. जीवात्मा हा रथी असून शरीर म्हणजे रथ आहे. बुद्धी हा या रथाचा सारथी असून मन म्हणजे लगाम आहे. पंच ज्ञानेंद्रिये व पंच कर्मेंदिये असे या रथाचे दहा घोडे आहेत. हा रथ योग्य मार्गावरून धावण्यासाठी मनरूपी लगाम हा बुद्धीरूपी सारथ्याच्या हातात असायला हवा. तरच सर्व घोडे एकाच दिशेने संचलित होऊन गंतव्यस्थान गाठता येईल. पण व्य…

नाम भावयुक्त अंतःकरणाने घ्यावे

Image
🌹🌹 नाम भावयुक्त अंतःकरणाने घ्यावे । 🌹🌹

मला आज देवाची गरज अशी वाटत नाही हे खरे, पण ती कशी वाटेल याचा तरी आपण विचार करावा. भगवत्‌चिंतनाने, नामाने ही गरज भासू लागते. गरज इतकी भासली पाहिजे की, अन्नपाणीसुद्धा गोड लागू नये.
जितकी आग जोराची तितका पाण्याचा मारा जास्त हवा, तसे जितकी देहबुद्धी बळकट तितका नामाचा जोर अधिक पाहिजे.

नामात प्रेम नाही म्हणून ते घेण्याचे सोडू नये. पाण्यात पडल्यावर पुढे पोहायला येते. काशीला गेले नाही तरी काशीस जायचे असे तरी म्हणावे; त्याप्रमाणे नामात प्रेम वाटत नसले तरी, नामात प्रेम आहे असे नित्य म्हणावे.

नामाशिवाय दुसरे सत्य नाही, दुसरे साधन नाही, असा दृढ विश्वास झाला म्हणजे नाम घेतल्याशिवाय राहवत नाही; आणि ते घेतल्याने, त्याच्या सहवासाने, त्याचे प्रेम येते.

संत देव आहे असे म्हणतात, मीही देव आहे असे म्हणतो; फरक इतकाच की, माझे म्हणणे अनुमानाचे असते.
संत देहातीत असतात; त्यांच्याजवळ गेल्याने देहाभिमान कमी होतो. प्रत्यक्ष गेले नाही तरी चालेल; भाव ठेवून कार्य जितके लवकर होते तितके देहाच्या सहवासाने होत नाही.

तीर्थास तीर्थपण, देवांस देवपण आणि गुरूंस गुरूपण आपण आपल्या भावन…

आध्यात्म म्हणजे काय

Image
🙏आध्यात्म म्हणजे काय 🙏

व्याख्या:
(१) सर्वसाधारणपणे हा देह मन चालवत असतो त्यामुळे त्या मनात येईल ते आपण करत असतो. ते बरोबर की चूक हे त्याचा परिणाम ठरवत असते तेव्हा प्रत्येक गोष्टीचा परिणाम चांगलाच येण्यासाठी त्या मनालाच चालवायला आपण शिकले पाहिजे ते शिकवणारे शास्त्र म्हणजेच आध्यात्म.
(२) परमेश्वराने निर्मिलेल्या सर्वच गोष्टी सकारात्मक. त्या गोष्टीस जे आपले मन नकारात्मक विचाराने किंवा गोष्टीने झाकू पाहते तेंव्हा त्या नकारात्मक गोष्टी किंवा विचार नष्ट करण्यास लागणारे सत्य व कृती म्हणजेच आध्यात्म होय.
(३) परमेश्वर निर्मित सृष्टीच्या रचनेस व नियमावलीस समजून घेणे व त्यावर (जन्म, मृत्यू, संकटे, आनंद, दु:ख इ)पूर्ण विश्वास ठेवणे, त्याने डोके रिकामे ठेवण्याची म्हणजे अनावश्यक गोष्टींवर अजिबात लक्ष न देण्याची आठवण होऊन पूर्णतः दुर्लक्ष करण्याची सवय लावून घेण्याचे शिकवणारे शास्त्र म्हणजे आध्यात्म. आध्यात्म म्हणजे श्रध्दा जाग्रुत करणे.
(४) मनासारखे कोणालाच जगता येत नसते. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे आध्यात्म. (५) मनात चांगल्या विचारामुळे चांगल्या इच्छा निर्माण होतात. चांगल्या इच्छा…

श्रीकल्याणस्वामी महाराज स्वानुभवपूर्वक सांगतात

Image
गे बाईये स्वामी तो आठवे मनीं । नित्य बोलतां चालतां जनीं । स्वप्न सुषुप्ती जागृती मौनी । खंड नाहींच अखंड ध्यानीं ।।
अलभ्याचा हा लाभ मज जाहला । विश्वजनासी उपेगा आला । कीर्तिरूपेंचि विस्तारला । दाही दिशा भरोनि पुरवला ।।
भक्तिप्रेमाचें तारूं उतटलें । ज्ञानवैराग्यतीरीं लागलें। संतसज्जनीं सांठवीलें । हीनदीनासि तिहीं उद्धरिलें ।।
ज्याच्या गुणांसी नाहीं गणना । ज्याच्या कीर्तीसी नाहीं तुळणा । जो स्वयंभ श्रीगुरुराणा । ब्रह्मादिकांसी बुद्धी कळेना ।।


धर्मस्थापना स्थापियेली । न्यायें नीतीनें भक्ति वाढविली । संतमंडळी ते निवाली । बहु दास ते भूमंडळी ।। 
जन्मजन्मांतरीं पुण्यकोटी। बहु संचित होतें गांठी । योगिरायाची जाली ज्यास भेटी । त्यास कल्याण होये सृष्टी ।।

श्रीसमर्थांची काव्यरचना इतकी विपुल आहे की, खरेतर तिला ‘ कवितासमुद्र ‘ असे म्हणणेच शोभून दिसेल.

हे सारे वाङ्मय वेळोवेळी साक्षेपाने लिहून ठेवण्याचे कार्य श्रीसमर्थांचे पट्टशिष्य श्री. अंबाजी कृष्णाजीपंत कुलकर्णी उपाख्य ‘ श्रीकल्याणस्वामी ‘ महाराजांनी मोठ्या निगुतीने व श्रद्धाप्रेमाने केलेले आहे. म्हणूनच त्यांचे गुरूबंधू ‘ अनंत कवी ‘ आदराने लिहितात…

कळकळीचे नामस्मरण

Image
आम्ही सुस्थितीत असलो म्हणजे आमचे नामस्मरण अधिक होते. त्यात काही बिघाड झाला तरी आपले स्मरण टिकून राहील ? द्रौपदीला आता आपला कोणी त्राता नाही असे वाटून जेव्हा तिने श्रीकृष्णाचा धावा केला, तेव्हा भगवान लगेच धावून आले. असे खऱ्या कळकळीचे स्मरण आपले असायला पाहिजे. जसे लहान मूल काहीही झाले तरी आपल्या आईलाच हाक मारते, दुसरे तिसरे कोणी जाणत नाही, तसे आपले परमेश्वर स्मरणाच्या बाबतीत झाले पाहिजे.
आपली भिस्त खरोखर कोणावर आहे हे संकटकाळीच उत्तम कळते. नामस्मरणाच्या पायऱ्या अशा सांगता येतील पहिली, सुस्थितीतले वरवरचे स्मरण; दुसरी, परमात्म्याशिवाय आपले कोणी नाही ही जाणीव होऊन संकटसमय़ी त्याचे स्मरण; आणि तिसरी, हीच जाणीव दृढ होऊन पुढे अखंड होणारे नामस्मरण. यांपैकी वरवर स्मरण करणारा ‘आम्हांला संकटेच नकोत असे म्हणतो, तर साधुसंत ‘आम्हांला संकटे येऊ देत’ असे भगवंताजवळ मागतात, कारण त्यावेळेसच त्याचे खरे स्मरण होते. आपण स्वत: आहोत याची आपल्याला आज जितकी खात्री आहे, तितकी खात्री भगवंत आहे अशी झाली पाहिजे. परमात्मा सर्व ठिकाणी आहे ही कल्पना केव्हा तरी आपल्याला होते खरी, पण ती कायम न राहिल्यामुळे दृढपणे आपल्या आ…

🌸🌸 रिकामा वेळ सगळा भगवंताकडे लावावा. 🌸🌸

Image
साधारणपणे ज्या वस्तू देहाला सुख देतात त्या पुष्कळ मिळवणे हे आपल्या जन्माचे ध्येय आहे असे आपल्याला वाटते.

परंतु अशा वस्तू ज्यांच्यापाशी पुष्कळ आहेत ती माणसे सुखी झालेली आढळत नाहीत. किंबहूना, अशा वस्तू जितक्या जास्त जमा कराव्या तितकी आपली हाव वाढतच जाते. पुढे वय झाल्यावर देह क्षीण होतो आणि त्याचे भोगण्याचे सामर्थ्य कमी होते. मग वस्तू असून देखील मनाची तळमळ कायम राहते. म्हणून शहाण्या माणसाने आत्तापासूनच आपले सुख बाहेरच्या वस्तूवर अवलंबून न ठेवण्याचा अभ्यास करावा. बाहेरची वस्तू सुटली तरी मनाला दुसरी वस्तू देणे अवश्य असते. अशी वस्तू म्हणजे भगवंत होय.

भगवंत हा नेहमी राहणारा, स्वयंपूर्ण आणि आनंदमय असल्यामुळे त्याचे चिंतन करता करता मनामध्ये ते गुण उतरतात. अर्थात्‌ मन भगवंताच्या चिंतनाने आनंदमय बनल्यावर त्या माणसाचे जीवन किती रसमय होत असेल याची कल्पना करावी.

आपल्यासारखा व्यवहारी प्रापंचिक माणसांना भगवंताचे चिंतन करण्यात एकच अडचण येते. ती म्हणजे व्यवहार आणि साधन यांची जोड घालणे. आपली अशी कल्पना असते की भगवंताचे चिंतन करणारा माणूस व्यवहार करू शकत नाही. तुकारामबुवांसारख्या परमात्मचिंतनात बेभान झा…

हृदयाला स्पर्श करणारी आणि मला आवडलेली काही वाक्य

Image
हृदयाला स्पर्श करणारी आणि मला आवडलेली काही वाक्य,,,,,
________________________

. .. वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं.. , आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळवाच लागतं.. . ..

 .. ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे.. , कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलेच कळलेय.. . . 

... “चांगली वस्तु”., “चांगली व्यक्ती”., “चांगले दिवस”.. , यांची किंमत “वेळ निघून गेल्यावर समजते”.. . ..

... आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं.. . ..

.. जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. , पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल.. . .. 

. .. “चांगली वस्तु”., “चांगली माणसे”., “चांगले दिवस आले की माणसाने “जुने दिवस विसरू नयेत”.. . .. .... पाणी धावतं., म्हणून त्याला मार्ग सापडतो.. . त्याप्रमाणे., जो प्रयत्न करतो त्याला यशाची., सुखाची., आनंदाची वाट सापडते.. . .. 

 .. नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. , कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात., तर आयुष…

किती छान लिहून ठेवलेय बघा तुकारामांनी

Image
संत तुकारामांनी सहज लिहिता लिहिता किती छान लिहून ठेवलेय बघा….
घासावा शब्द | तासावा शब्द | तोलावा शब्द | बोलण्या पूर्वी ||
शब्द हेचि कातर | शब्द सुईदोरा बेतावेत शब्द | शास्त्राधारे ||
बोलावे मोजके | नेमके ,खमंग ,खमके | ठेवावे भान | देश ,काळ ,पात्राचे
बोलावे बरे | बोलावे खरे | कोणाच्याही मनावर | पाडू नये चरे ||
कोणाचेही वर्म | व्यंग आणि बिंग | जातपात धर्म | काढूच नये ||
थोडक्यात समजणे | थोडक्यात समजावणे | मुद्देसुद बोलणे | हि संवाद कला
शब्दांमध्ये झळकावी | ज्ञान , कर्म ,भक्ती | स्वानुभवातून जन्मावा | प्रत्येक शब्द ||
शब्दां मुळे दंगल | शब्दां मुळे मंगल | शब्दांचे हे जंगल | जागृत राहावं ||
जीभेवरी ताबा | सर्वासुखदाता | पाणी ,वाणी ,नाणी | नासू नये🌹

नामाचे त्रिकालबाधित श्रेष्ठत्व !

Image
🌷🌷नामाचे त्रिकालबाधित श्रेष्ठत्व ! 🌷🌷

नाम हे सच्चिदानंद स्वरूप आहे. शुद्ध परमात्मस्वरूपाच्या अगदी जवळ कुणी असेल तर ते फक्त नामच होय.

नाम हे चिन्मय असल्यामुळे त्याचा आनंद ओसंडून येतो आणि ही सृष्टी तयार होते. अनेक रूपे घडविणे, ती मोडणे आणि नवीन तयार करणे, पण आपण स्वतः मात्र मूळ स्वरूपाने राहणे, ही केवढी विलक्षण लीला आहे !

खरोखर, तुम्हाला मी काय सांगू ! बोलायला शिकल्यापासून आजपर्यंत मी नामाबद्दलच बोलत आहे, अजून नामाचे माहात्म्य संपत नाही.

नामाचे माहात्म्य सांगून संपले तर भगवंताचे भगवंतपण लटके झाले असे समजावे.
जो नामात ‘मी’ पणाने नाहीसा झाला त्यालाच नामाच्या माहात्म्याची कल्पना आली. असा पुरूष नामाविषयीं मौन तरी धरील, कारण त्याचे माहात्म्य कोणालाच सांगता येणार नाही; किंवा शेवटच्या श्वासापर्यंत नामाचे माहात्म्यच सांगत राहील, कारण ते कितीही सांगितले तरी संपणार नाही, आणि कितीही ऐकले तरी तृप्ती होणार नाही.

नामाने सर्व पापे नाहीशी होतात. भगवंताला विसरणे हे सर्वांत मोठे पाप आहे. नामाने भगवंताचे स्मरण होते.

नाम हे वेदांपेक्षाही श्रेष्ठ आहे, कसे ते पहा. वेदाध्ययनापासून फायदा होण्यासाठी चारी वे…